Posts

Showing posts from August, 2020

शिवाजी विद्यापीठ एप्रिल 2020 परीक्षा निकाल आणि प्रवेश

शिवाजी विद्यापीठाच्या एप्रिल 2020 परीक्षा व निकाल या संदर्भात   दि.19 ऑगस्ट 2020 च्या शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकात पुढीलप्रमाणे सूचना आहेत  🔷️  भाग 1 आणि 2 या वर्गाचे सर्व विद्यार्थी पुढील वर्षात प्रवेश घेण्यास पात्र आहेत आणि  त्यांचे निकाल पुढीलप्रमाणे लावण्यात येतील. या विद्यार्थ्यांचे ५०% अंतर्गत गुण ( १०० गुणात रूपांतर) व ५० % लगतच्या सत्रातील परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील . उदा. सत्र -१ मध्ये  विद्यार्थ्यांस ६६% गुण असतील तर ६६/२=३३ व सत्र २ मध्ये अंतर्गत परीक्षेत ( १०० % गुणात परिवर्तित ) ८०% असतील तर ८०/२=४० असे  ३३+४०= ७३% गुण देवून निकाल  घोषित करण्यात येईल. 🔷️ जर अंतर्गत परीक्षा नसतील तर लगतच्या सत्रातील परीक्षेच्या गुणावर निकाल घोषित केला जाईल.  🔷️ भाग 1 अणि 2 मधिल काही विषय अनुत्तीर्ण असतील तर त्या संबंधित विषयाची परीक्षा पुढिल कालावधीत होणार आहे.  🔷️ भाग 2 मधील पर्यावरण  विषयाचा निकाल त्या विषयातील प्रोजेक्ट वर्क किंवा अंतर्गत गुणांवर लावला जाईल. 🔷️ जर असे तयार करून घोषित केले जाणारे निकाल विद्यार्थ्यांना मान्य नसतील तर पुढील कालावधीत परीक्षा अर्ज भरून परीक्षा